आपला चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधायचा? How to find a stolen or lost Mobile?

Table of Contents

आपला चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधायचा? How to find a stolen or lost Mobile?

तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल आणि तुम्हाला तुमचा मोबाईल शोधायचा असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन घरी बसून शोधू शकता. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. पण आत्ताच्या या एकविसाव्या शतकात मोबाईल ही चौथी मूलभूत गरज बनला आहे. त्यामुळे आपला मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर आपल्याला काय वाटते ते मी समजू शकतो. पण घाबरू नका, जर आपला मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर आपल्या मोबाईलचे लोकेशन आपण घरी बसल्या कसे पाहू शकतो याची माहिती या लेखामधून देणार आहे.

मी तुमच्यासोबत असे काही मार्ग शेअर करणार आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन स्वतः ट्रॅक करू शकता आणि ही पद्धत Google ची स्वतःची आहे. यामध्ये मी तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती शेअर करत नाही आहे.  जर तुमचा फोन अँड्रॉइड असेल तर तुम्ही त्यासाठी “Google find my device” ऍपची मदत घेऊ शकता किंवा ऑनलाइन वेबसाइटच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरचे लोकेशन देखील शोधू शकता.

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास काय करावे

जर तुम्ही “Google find my device” ऍपची मदत घेतली तर प्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुमच्या जीमेल आयडी आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल.  पण लक्षात ठेवा की तुम्हाला तोच जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल जो तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये वापरला गेला आहे.  त्यानंतर तुम्हाला ALLOW च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल कारण तुम्ही लॉगिन करताच, ऍप्लिकेशन तुमच्याकडून परवानगी मागेल आणि तुम्हाला ALLOW करावे लागेल.  तुम्ही परवानगी देताच तुमच्या मोबाईलचे लोकेशन दिसेल, पण हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधत असताना त्या फोनमध्ये GPS व इंटरनेट चालू असले पाहिजे. फोन देखील चालू असला पाहिजे. अन्यथा, तुम्ही ऍपद्वारे तुमच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही.

ED अर्थात अंमलबजावणी संचालनालय नक्की आहे तरी काय?

जर तुम्हाला दुसरी पद्धत वापरायची असेल तर तुम्ही वेबसाइटच्या मदतीने मोबाईल नंबरचे लोकेशन देखील शोधू शकता.  त्यासाठी तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर Google chrome उघडावे लागेल आणि त्यात ‘Android device manager’ टाइप करून सर्च करावे लागेल.  सर्च केल्यानंतर तुमच्या सिस्टममध्ये वेबसाइट उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड भरावा लागेल.  तुम्ही तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यावर तुमच्या मोबाईलचे लोकेशन दिसेल.  यामध्ये जर तुमच्या फोनचे लोकेशन ऑन असेल आणि इंटरनेट चालू असेल तरच ही वेबसाइट तुम्हाला तुमच्या मोबाईलचे लोकेशन सांगेल.  पण या वेबसाइटमध्ये तुम्हाला 3 पर्यायही मिळतील.

  • Play Sound

  • Lock

  • Erase

“हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवशी फडकणार घरोघरी तिरंगा..!

Play sound या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलची रिंग वाजू लागते.

Lock या पर्यायावर क्लिक केल्यास मोबाईल लॉक होईल.

Erase या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलीट होईल.

आम्हाला आशा आहे की आमच्याद्वारे दिलेल्या माहितीवरून तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल कसा शोधायचा हे समजलं असेल. जर तुम्हाला या माहितीशी संबंधित काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.

धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *