इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 : नियमित फेरी-1, अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी मुदतवाढ..!
इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-2023 | 11वी प्रवेश नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया | 11th admission online form process
११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे माहिती | 11th admission part 1 filing step by step | 11th admission form | 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 | 11th admission nashik
सन 2022-23 मध्ये राज्यातील महानगर क्षेत्र ( MMR ) तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नियमित प्रवेश फेरी क्र. 1 साठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रवेश अर्जाचा भाग -1 भरणे तसेच पसंती अर्ज भाग -2 भरणेची मुदत दि. 27/07/2022 रोजी संपलेली आहे. परंतु या ऑनलाईन अर्जाबाबत पुढील बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
1. प्रवेश अर्ज भाग- 1 भरुन लॉक केलेला आहे परंतु अर्ज प्रमाणित झालेले नाहीत असे विद्यार्थी – 6041
2. प्रवेश अर्ज भाग- 1 प्रमाणित आहे परंतु भाग- 2 भरलेला नाही असे विद्यार्थी – 5889
अशाप्रकारे सुमारे 11930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग- 2 भरलेले नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश फेरी- 1 मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत सबब हे विद्यार्थी प्रवेशाच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी नियमित प्रवेश फेरी- 1 साठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यासाठी सूचित केले आहे. त्या मुदतवाढीचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :-
अर्ज भाग – 1 शाळा व मार्गदर्शन केंद्र यांनी प्रमाणित करणे : दि. 30/07/2022 रोजी सायं. 05:00 वाजेपर्यंत.
पसंती अर्ज भाग- 2 भरुन लॉक करणे : दि. 30/07/2022 रोजी सायं. 06:00 वाजेपर्यंत.
सदर वाढीव कालावधीमध्ये नवीन अर्जाचा भाग – 1 भरता येणार नाही.
कोटांतर्गत प्रवेश व सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबत दुरुस्ती यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार कार्यवाही सुरु राहील. तसेच दि . 30/07/2022 नंतर प्रवेशाबाबत सर्व कार्यवाही यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहील त्यामध्ये कोणाताही बदल केलेला नाही.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी पोर्टलवर विद्यार्थी लॉगीन मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपले गुण व गुणवत्ता क्रमांक तपासून खात्री करावी. त्याबाबत काही आक्षेप असल्यास Send Grievance द्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, त्यानुसार संबंधित शिक्षण उपसंचालक यांनी तपासून त्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात. ही कार्यवाही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी. कोटांतर्गत प्रवेशाबाबत विद्यालय स्तरावरुन प्रवेशासाठी कोटांतर्गत राखीव ठेवलेल्या जागांवरील प्रवेश दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यालय स्तरावरुनच करता येतील. त्यासाठी प्रवेशाच्या पोर्टलवरुन कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यालयांना उपलब्ध केली जातील. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणे व त्यामध्ये बदल करणे कार्यवाही निरंतर सुरु राहील. पहिल्या टप्प्यात निवड न झालेले तसेच नवीन पसंती नोंदविलेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र असतील. अशा प्रकारे प्रत्येक प्रवेश फेरीसाठी दिलेल्या वेळेत विद्यालयांना कोटाप्रवेश करता येतील.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे व नियमानुसार प्रवेश देणे ही जबाबदारी संबंधित विद्यालयांची असेल.
शासन निर्णय क्र प्रवेश -२०१८/प्रक्र. ३३३/एसडी -२ दि. ०७/०३/२०१९ मधील तरतूदीनुसार इ. ११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल.