बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास काय करावे

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; तुम्ही फक्त ‘1930’ हा नंबर डायल करा.

काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर टाकली जाईल

आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी सर्वचजण ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) हा पर्याय वापरतात. या Online Transaction मुळे लोकांचे जीवन सुखमय व गतिमान झालेच; परंतु यामधून Cyber crime सारखे काही धोके देखील निर्माण झाले आहेत. सायबर गुन्हेगार हे याच ऑनलाईन माध्यमांचा वापर करून बनावट कॉल किंवा एसएमएस वरून फसवणूकीने आपल्या खात्यातील रक्कम त्यांच्या खात्यावर घेत आहेत. परंतु ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ ने या समस्येवर उपाय शोधला आहे.

आपल्याला सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित 1930 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एक प्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 1930 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *