BMC Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 | अग्निशामक भरती 2023 | Fireman recruitment 2023 | MCGM BMC Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये अग्निशामक (Fireman) पदांच्या एकूण 910 जागांसाठी सरळसेवेने (Walk in selection) पद्धतीने भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना भरतीसाठी थेट मुलाखतीचे आवाहन करण्यात येत आहे. त्या जागांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 910 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण (कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक) किंवा दहावी उत्तीर्ण आणि भारतीय सेनेत 15 वर्षे सेवेचा अनुभव.
शारीरिक पात्रता
1. पुरुष
- उंची – 172 सेमी पेक्षा कमी नसावी.
- छाती – न फुगवता 81 सेमीपेक्षा कमी नसावी. फुगवुन ५ सेमी जास्त
- वजन – 50 किग्रॅ पेक्षा जास्त
2. महिला
- उंची – 162 सेमी पेक्षा कमी नसावी
- वजन – 50 किग्रॅ पेक्षा जास्त
वयाची अट – दि. 31 डिसेंबर 2023 रोजी 20 वर्षे ते 27 वर्षे (मागासवर्गीय यांना 5 वर्षे सूट)
अर्जाची फी –
- खुला प्रवर्ग – ₹944/-
- मागासवर्गीय / आदूघ / अनाथ – ₹590/-
भरतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), JBCN शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई – 400103.
भरतीला हजर राहण्याची तारीख : 13 जानेवारी 2023 ते 04 फेब्रुवारी 2023
टिप – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.