शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा | Teacher Aptitude and Intelligence Test Examination 2022 | TAIT Examination 2022
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ”पवित्र” या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT)- 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा – लवकरच पवित्र या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.
शैक्षणिक अर्हता : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण 2018/प्र. क्र.397/TNT-1, दि.07 फेब्रुवारी 2019, शासन शुद्धिपत्रक, 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जून 2019 तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेस अर्ज करण्यास पात्र असतील.
परीक्षेची फी :
- खुला प्रवर्ग : ₹950/-
- मागासवर्गीय /आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ / दिव्यांग : ₹850/-
प्रवेशपत्र उपलब्ध : 15 फेब्रुवारी 2023 पासून
ऑनलाईन परीक्षा : 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023.