Pune Municipal Corporation PMC Recruitment 2022 Syllabus & Exam Format
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 2 व गट 3 मधील रिक्त असणारी सहाय्यक विधी अधिकारी, लिपीक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक ही पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. 10 ऑगस्ट पर्यंत मागविणेत आले होते. या पदांच्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखात आपण या परीक्षेचे स्वरूप कसे असे याची माहिती पाहणार आहोत.
परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे एकुण 200 गुणांची परीक्षा असेल. सदर परीक्षेसाठी एकुण 2 तास (120 मिनीटे) एवढा वेळ असेल. सदरची परीक्षा ही वरील गट 2 व 3 मधील पदांची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप, भाषा, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान इ. शी संबंधित असेल.
पदनिहाय परीक्षेचे विषय व गुणांकन यांची माहिती खालीलप्रमाणे पाहुया
पदनाम – सहाय्यक विधी अधिकारी
विषय –
- मराठी (प्रश्न 15 गुण 30)
- इंग्रजी (प्रश्न 15 गुण 30)
- सामान्य ज्ञान (प्रश्न 15 गुण 30)
- बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न 15 गुण 30)
- विधी संबंधित (प्रश्न 40 गुण 80)
- एकुण गुण 200
अ. क्र. 1 ते 4 या विषयांचा दर्जा बारावी परीक्षेच्या दर्जासमान व परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी अशा स्वरूपाचे असेल.
अ. क्र. 5 या विषयाचा दर्जा विधी शाखेच्या पदवी परीक्षेच्या दर्जासमान असेल व परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी स्वरूपाचे असेल.
पदनाम – लिपीक टंकलेखक
विषय –
- मराठी (प्रश्न 25 गुण 50)
- इंग्रजी (प्रश्न 25 गुण 50)
- सामान्य ज्ञान (प्रश्न 25 गुण 50)
- बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न 25 गुण 50)
- एकुण गुण 200
अ. क्र. 1 ते 4 या विषयांचा दर्जा बारावी परीक्षेच्या दर्जासमान व परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी अशा स्वरूपाचे असेल.
पदनाम – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/वाहतुक)
विषय –
- मराठी (प्रश्न 15 गुण 30)
- इंग्रजी (प्रश्न 15 गुण 30)
- सामान्य ज्ञान (प्रश्न 15 गुण 30)
- बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न 15 गुण 30)
- अभियांत्रिकी विषयाशी संबंधित (प्रश्न 40 गुण 80)
- एकुण गुण 200
अ. क्र. 1 ते 4 या विषयांचा दर्जा बारावी परीक्षेच्या दर्जासमान व परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी अशा स्वरूपाचे असेल.
अ. क्र. 5 या विषयाचा दर्जा पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान असेल व परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी स्वरूपाचे असेल
पदनाम – सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक
विषय –
- मराठी (प्रश्न 15 गुण 30)
- इंग्रजी (प्रश्न 15 गुण 30)
- सामान्य ज्ञान (प्रश्न 15 गुण 30)
- बुद्धिमत्ता चाचणी (प्रश्न 15 गुण 30)
- तांत्रिक विषयाशी संबंधित (प्रश्न 40 गुण 80)
- एकुण गुण 200
अ. क्र. 1 ते 4 या विषयांचा दर्जा बारावी परीक्षेच्या दर्जासमान व परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी अशा स्वरूपाचे असेल.
अ. क्र. 5 या विषयाचा दर्जा शासनाकडील सर्व्हेअर कोर्स/सब ओव्हरसियर परीक्षेच्या दर्जासमान असेल व परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी स्वरूपाचे असेल
अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 2 व गट 3 मधील रिक्त असणारी सहाय्यक विधी अधिकारी, लिपीक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/वाहतुक), सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक या पदांच्या भरतीच्या परीक्षेचे स्वरूप असणार आहे.