सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विद्यार्थ्यांना ‘कंबाईन पासिंग’साठी दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विद्यार्थ्यांना ‘कंबाईन पासिंग’साठी दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) अंतर्गत सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या उन्हाळी सत्रासाठी तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा दिल्या आहेत ते “एकत्रित उत्तीर्ण” म्हणजेच “कम्बाईन पासिंग” साठी पात्र असतील. अशी माहिती विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्राप्त झाली आहे.


मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झाले बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांनी या तरतुदीसाठी पात्र होण्यासाठी लेखी आणि तोंडी किंवा प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी लागू होणाऱ्या परीक्षांपैकी एकही चुकवली असेल, तर ते एकत्रित उत्तीर्ण सुविधेसाठी पात्र ठरणार नाहीत, असेही ते म्हणाले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा म्हणून एकत्रित उत्तीर्ण होण्याचा निर्णय केवळ 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आला असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षीच्या परीक्षेचे म्हणजेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षेचे निकाल वेगळे न करता त्या सर्वांमध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रित मोजणी करून जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

कंबाईन पासिंग बरोबर परीक्षेपैकी कोणत्याही परीक्षेस विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू राहणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *