13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवशी फडकणार घरोघरी तिरंगा

Table of Contents

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवशी फडकणार घरोघरी तिरंगा..!

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. त्यास
अनुसरुन उच्च व तंत्र शिक्षण विभागंतर्गत शासकीय/निमशासकीय कायालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्या संदर्भात शासन परिपत्रक क्र.संकीर्ण 2022/प्र.क्र.82/आस्था-2, नुसार  सूचित केले आहे.

        भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक 12 मार्च 2021 पासून पुढील 75 आठवडे पर्यंत म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविष्यात येणार आहे. या अमृत महोत्सवनिमित्त संपूर्ण देशामध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या रोजी रबविण्यात येणार आहे.

शासन परिपत्रक नुसार “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यासंदर्भात पुढील सूचना देण्यात आलेल्या आहेत .

१. प्रत्येक विभाग / उप विभाग, विद्यापीठ/महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर “ घरोघरी तिरंगा ” ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करावे.
२. सर्व शासकीय / निम शासकीय अधिकारी / कर्मचारी / शिक्षक / शिक्षेतर कर्मचारी / विद्यार्थी / पालक यांनी समाज माध्यामांद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, इ.) तिरंग्याविषयक चित्र संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभाग / प्रमुख कार्यालय प्रमुखांनी आवाहन करावे.
३. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करुन या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार प्रसार व जाणीव जागृती करावी. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणावर आयोजन करता येईल.
४. शासकीय / निम शासकीय इमारतींबरोबरच खाजगी इमारतींवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकविण्याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.
५. सांस्कृतिक कार्य विभागाने सदर उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, इ. ची निर्मिती केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जिंगल्स गीते, पोस्टर्स, इ. चा वापर शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी करावा.
६. सदर उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका / गांव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील.
७. “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” अंतर्गत विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो, चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांचेमार्फत सुरु आहे. त्याचप्रमाणे “घरोघरी तिरंगा” कार्यक्रमाचे फोटो, चित्रफिती, इ. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटवर अपलोड होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी, रा.से.यो. यांनी विशेष पथक तयार करुन त्यांचेमार्फत अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरुन राज्यातील उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती देश पातळीवर पोहचेल.
८. वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते – अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे . त्यामुळे याबाबत देखील जाणीव जागृती करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *