Maharashtra State Security Corporation Recruitment 2022

Table of Contents

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ (पूर्वीचे MSF) भरती प्रकिया पुन्हा सुरु

सुरक्षा रक्षक भरती जाहिरात 2020 दि. 25/02/2020 रोजी महामंडळाने 7000 सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार मार्च – एप्रिल 2020 या दरम्यान मुंबई व नागपूर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण कोविड-19 या साथीच्या रोगामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यामुळे 2020 मध्ये ज्यांनी अर्ज भरले होते त्या उमेदवारांची आता पुन्हा ही भरती प्रक्रिया दि. 20/08/2022 पासून खालील नमूद राज्य राखीव पोलीस बल गट या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे.

अ.  क्र. राज्य राखीव पोलीस बल गटाचे नाव उमेदवारांची संख्या उमेदवारांचे पत्यानुसार जिल्हे
1 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 01, पुणे  13059 पुणे जिल्हा / अपूर्ण पत्ता असलेले उमेदवार
2 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 05, दौड 17126 सातारा, सोलापूर, नाशिक
3 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 07, दौड 15463 सांगली , कोल्हापूर , अहमदनगर
4 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 06, धुळे 18811 धुळे , जळगाव , नंदूरबार
5 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 03, जालना 17905 जालना , हिंगोली , बीड , उस्मानाबाद , परभणी
6 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14, औरंगाबाद 19322 औरंगाबाद , लातूर , बुलढाणा , नांदेड
7 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19, बाळेगाव, नवी मुंबई 7005 मुंबई , नवी मुंबई , ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग 
8 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 04, नागपूर 11672 नागपूर , भंडारा , गोंदीया , चंद्रपूर , गडचिरोली
9 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 09, अमरावती 13330 अमरावती , यवतमाळ , अकोला , वर्धा , वाशिम

सुधारित प्रसिद्धीपत्रकामधील उमेदवारांसाठी सूचना

१. सदर भरती प्रक्रिया ही मुळ जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार त्याचप्रमाणे वयाचा निकष यासाठी जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेली दिनांक आधारभूत धरली जाणार आहे . प्रत्येक दिवशी प्रत्येक केंद्रावर १५०० उमेदवार बोलाविण्यात येणार आहेत.
२. जाहिरातीमधील नमुद किमान निकष पूर्ण करणारे व भरती शुल्क महामंडळाकडे जमा केलेले उमेदवार यांना सदर भरतीप्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे .
३. उमेदवारांची जिल्हानिहाय यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे . यादीत दर्शविलेल्या दिनांकास त्यांनी भरतीसाठी शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसह हजर राहावे , असे याव्दारे कळविण्यात येत आहे 
४. उमदेवारांना ठरवून दिलेल्या दिनांकास भरतीसाठी हजर होणे काही अपरिहार्य कारणास्तव शक्य न झाल्यास , त्यांना त्यानंतर पुढील ०३ दिवसात संबधीत भरती केंद्रावर हजर राहता येईल .
५. प्रत्येक उमेदवारांनी भरतीवेळी येताना ऑनलाईन अर्जाची छायांकित प्रत , अर्ज शुल्क भरणा केलेली पावती , ०२ फोटो , शैक्षणिक मुळ कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी . 
६. दि . १८.०८.२०२१ रोजी महामंडळाने प्रस्तुत भरती रद्द करण्याबाबत जारी केलेले प्रसिध्दीपत्रक याव्दारे रद्द करण्यात येत आहे . 
अधिकृत संकेतस्थळ : Click here

सुधारित प्रसिद्धीपत्रक : Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *