भारताचे उपराष्ट्रपती
भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती नंतर दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील 63व्या कलमानुसार उपराष्ट्रपती हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती हे राष्टपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष हिदेखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड यांची 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
26 नोव्हेंबर 1950 पासून भारताचे संविधान लागू करण्यात आले. त्यानुसार 1950 पासून भारताचा राज्यकारभार भारतीयांमार्फत चालवला जाऊ लागला. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत एकूण 13 व्यक्तींनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला व दि. 08 ऑगस्ट 2022 रोजी 14वे उपराष्ट्रपती म्हणून श्री. जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. या लेखामधून 14 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ थोडक्यात आपण पाहणार आहोत.
भारताचे उपराष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ
1. सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म : 1888 मृत्यू: 1975
- पदग्रहण – 13 मे 1952
- पद सोडले – 12 मे 1962
आपला चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधावा
2. झाकिर हुसेन
जन्म : 1897 मृत्यू : 1969
- पदग्रहण – 13 मे 1962
- पद सोडले – 12 मे 1967
3. वराहगिरी वेंकट गिरी
जन्म : 1894 मृत्यू :1980
- पदग्रहण – 13 मे 1967
- पद सोडले – 3 मे 1969
4. गोपाल स्वरूप पाठक
- पदग्रहण – 31 ऑगस्ट 1969
- पद सोडले – 30 ऑगस्ट 1974
5. बी.डी. जत्ती
- पदग्रहण – 31 ऑगस्ट 1974
- पद सोडले – 30 ऑगस्ट 1979
6. मोहम्मद हिदायत उल्लाह
- पदग्रहण – 31 ऑगस्ट 1979
- पद सोडले – 30 ऑगस्ट 1984
7. रामस्वामी वेंकटरमण
- पदग्रहण – 31 ऑगस्ट 1984
- पद सोडले – 24 जुलै 1987
8. शंकर दयाळ शर्मा
- पदग्रहण – 03 सप्टेंबर 1987
- पद सोडले – 24 जुलै 1992
9. के.आर. नारायणन
- पदग्रहण – 21 ऑगस्ट 1992
- पद सोडले – 24 जुलै 1997
10. कृष्णकांत
- पदग्रहण – 21 ऑगस्ट 1997
- पद सोडले – 27 जुलै 2002
11. भैरोसिंग शेखावत
- पदग्रहण – 19 ऑगस्ट 2002
- पद सोडले – 21 जुलै 2007
12. मोहम्मद हमीद अंसारी
- पदग्रहण – 11 ऑगस्ट 2007
- पद सोडले – 11 ऑगस्ट 2017
13. व्यंकय्या नायडू
- पदग्रहण – 11 ऑगस्ट 2017
- पद सोडले – 11 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल
14. जगदीप धनखड
- पदग्रहण – 12 ऑगस्ट 2022 रोजी पदभार स्विकारतील