जगदीप धनखड
जगदीप धनखड हे भारताचे वर्तमान आणि १४ वे उपराष्ट्रपती आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. याआधी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
जगदीप धनखर यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना जि. झूनझुनू या छोट्या गावात झाला. धनखर यांनी किठाणा गावच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपले शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगढ येथून पूर्ण केले आणि त्यानंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली. धनखर यांचा विवाह १९७९ मध्ये सुदेश धनखड यांच्याशी झाला. त्यांना कामना नाव असलेली एक मुलगी आहे.
वैयक्तिक परिचय
संपूर्ण नाव : जगदीप गोकलचंद धनखड
जन्मतारीख : 18 मे 1951
जन्मठिकाण : किठाणा, ता. चिरवा, जि. झूनझुनू, राज्य – राजस्थान
शिक्षण :
- पदवीधर (भौतिकशास्त्र Physics), महाराजा कॉलेज जयपूर. (राजस्थान विद्यापीठ)
- L.L.B., Rajasthan University.
कारकीर्द
1990 पासून, जगदीप धनखड हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकीली करत होते. जनता दल पक्षाकडून नवव्या लोकसभेत 1989-1991 दरम्यान राजस्थानमधील झुनझुनू लोकसभा मतदारसंघ येथून ते खासदार होते. ते 1993-1998 दरम्यान राजस्थानच्या दहाव्या विधानसभेत किशनगड, राजस्थान येथून विधानसभेचे माजी सदस्य (आमदार) होते आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे माजी अध्यक्ष होते. 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. नंतर 17 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.