Border Road Organization (BRO) Recruitment 2022
सीमा रस्ते संघटना ही संस्था भारताच्या सीमेवर तसेच मित्रदेशांच्या अवघड भागांत रस्ते बांधते व त्यांची निगा ठेवते. या संस्थेत विविध पदांच्या एकूण 246 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
एकूण जागा – 246
पदाचे नाव आणि तपशील –
- ड्राफ्ट्समन (14 जागा)
- सुपरवाइजर (एडमिन) (07 जागा)
- सुपरवाइजर स्टोअर (13 जागा)
- सुपरवाइजर सायफर (09 जागा)
- हिंदी टायपिस्ट (10 जागा)
- ऑपरेटर (कम्युनिकेशन) (35 जागा)
- इलेक्ट्रिशियन (30 जागा)
- वेल्डर (24 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) (22 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) (82 जागा)
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1 साठी : (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव
- पद क्र.2 साठी: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)
- पद क्र.3 साठी: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य
- पद क्र.4 साठी: विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र.5 साठी: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.6 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
- पद क्र.7 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य
- पद क्र.8 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य
- पद क्र.9 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)
- पद क्र.10 साठी: 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता –
विभाग | उंची (सेमी) |
छाती (सेमी) | वजन (किग्रॅ) |
---|---|---|---|
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
पूर्व हिमालयी प्रदेश | 152 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
दक्षिनी क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
गोरखा (भारतीय) | 152 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
वयाची अट : 26 सप्टेंबर 2022 रोजी वय विचारात घ्यावे.
- पद क्र. 1 ते 8 साठी : 18 ते 27 वर्षे
- पद क्र. 9 व 10 साठी : 18 ते 25 वर्षे
(SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी : सर्वसाधारण प्रवर्ग : ₹50/- ( SC / ST : फी नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत देशामध्ये
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune – 411015
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2022.
वेबसाईट : Click here
जाहिरात व अर्ज (Application form) : Click here
फी भरण्यासाठी : Click here